profile-pic
Dr Harish Patankar

Designation: B.A.M.S. M.D. , PH.D. (SCH)

Experience: 14 years

Location: Pune, Maharashtra

About Doctor

Dr. Harish Patankar is an Ayurvedic Physician and Chief Consultant at Kayayurved, Sadashiv Peth, Pune, having an experience of 14 years in the field of Ayurveda. He has completed his B.A.M.S(Bachelor's of Ayurvedic Medicine And Surgery), pursued (M.D)Doctor of Medicine in Ayurveda, and is a Ph.D scholar.

DAYS & TIMINGS

Day Morning Evening
MON 10:00 AM to 1:00 PM 4:00 PM to 8:30 PM
TUE 10:00 AM to 1:00 PM 4:00 PM to 8:30 PM
WED 10:00 AM to 1:00 PM 4:00 PM to 8:30 PM
THU 10:00 AM to 1:00 PM 4:00 PM to 8:30 PM
FRI 10:00 AM to 1:00 PM 4:00 PM to 8:30 PM
SAT 10:00 AM to 1:00 PM 4:00 PM to 8:30 PM
SUN - -

Special OPD

@ Mumbai Now on Every 2nd Sunday of Month.

Address:

SHREE VISHWAHERAMB AYURVEDIC CHIKITSALAYA
Matoshree Sahakari Grahnirman Sanstha First Floor Room no 104, Jerbai Wadia Rd, near Indian Cancer Society, Bhoiwada, Parel, Mumbai, Maharashtra 400012

Timing :10 to 4 pm only.

By Prior Appointment Only 

Consultation Fee:Rs. 500.00  

Clinic Details

Address Type : Clinic

Clinic Name : Kayayurved India Pvt Ltd

Address : 1525, Suvidha Smita Apartment , Near Tilak Smarak, Sadashiv Peth Pune

State : Maharashtra

City : Pune

Clinic email : [email protected]

Phone number: +91 20 24481699

Mobile Number: +91 98236 61688

About Doctor

Dr. Harish Patankar 
B.A.M.S, M.D.(Kriya Sharir)
Well known Ayurveda practitioner in India and Abroad. 
Renowned Nadee Tadnya,
Well known Yoga Teacher,
Well versed Sanskrit Teacher.
Director - Keshayurved-India’s First Ayurvedic Hair Testing lab and Research Center.
Chief Consultant – Aarogyavardhini Chikitsaalaya, Maharashtra, Pune.

  • Author of various books on Ayurveda – Dravyaguna Vidnyan
    Ayurved Cosmetology
    Keshayurved and Ayurvedachya Smrutitun . 
  • Director of Various DVDs and CDs related to Ayurveda like Nadee vidnyan and Smruti  Ayurveda 
  • Lecturer on Various National and International Seminars and Webinars 
  • Founder of “Prachin Sanhita Gurukul” – An ancient way of learning ayurveda and experiencing ancient lifestyle. 
  • Associate Ayurvedic Adviser for Vasundhara Community Radio Baramati. 
  • Specially Invited for Interview As a Guest For Ayurveda Information and Propagation Sahyadri
  • Conducts various Lectures on Ayurveda at Different Places in India as well as Abroad. 
  • Conducted various Certification Courses for Russian, Japanese, French, Australian and USA Delegates. Conducted successful seminars from 2009 in different places in Russia – Sochi, Smolensk, Evanova, Yaraslav, Moscow for Propogation Of Ayurveda – In Russia
    •  Chief Doctor At Aarogyavardhini Chikitsalaya, Pune.
    •  Co – Ordinator And Lecturer For “Certification Course In Nadi Vidnyan“.
    •  Guest Faculty Lecture For “Certificate Course In Ayurvedic Cosmetology “. MUHS Nashik.
  • Founder Lecturer of Certificate course in Ayurvedic Cosmetology & Trichology nadi vigyan and muhs course
  • Skin Care
  • Ayurvedic Doctor Consultation
  • Infertility
  • Hair Fall Treatment
  • Kidney Stones
  • Jaundice
  • Fever Treatment
  • Migraine
  • Dengue Fever Treatment
  • Headache
  • Liver Problems
  • Alopecia
  • Women Healthcare Problems
  • Obesity
  • Thyroid
  • Diabetes
  • Hypertension (Blood Pressure)
  • Kati Basti
  • Janu Basti
  • Arthritis
  • Panchakarma
  • GarbhSanskar
  • Agnikarma
  • Nadee Pariksha
  • Awarded with “ Swadeshi Bharat Sanman -2009”
  • Awarded with “ Pujya Padacharya Rachanatmak Karya – 2016” 
  • Awarded with “Ayurved Mitra Puraskar- 2018.
  • Awarded with Best President of Lions Club Of Pune Supreme 2014.
  • Awarded Three Times with Special Trophy for “Sanwad Parivartanacha” by Commissioner Of Pune For outstanding work in criminal counseling. 2015.
  • Awarded By Commissioner Of Police Mrs Meera Borwankar for special social work for police.
  • Appreciated By Traffic Commissioner Of Police Mr Vishwas Pandhare for Netratarpan Project.
  • Appreciated By Ayush Minister Govt. Of India Hon. Mr. Shripadji Naik and Ex. President Of India Hon. Mrs Pratibhatai Patil for project of Smruti Ayurveda. 
  • Got First Prize in Poster Presentation At First International Ayush Conference held at Dubai with Ministry Of Ayush (Govt Of India). 
  • Special Appriciation for Paper Presentation On Nadee Parikashan via Modern Technique at 7th World Ayurved Congress held at Kolkatta in 2016. 
  • Conducted 1st International Symposium at Pune in Jan 2018. Special appreciation and presence of Ayurved Chairperson Ambassy Of India, Hungary, Dr Asmita Wele. 
  • Completed Successfully Netratarpan of more than 6500 delegates and patients via Camps with Lions Club International.
  • Motivated more than Thousands of Students and Doctors to start Ayurvedic practice in India and Abroad. 
  • Website Links For More Info- www.keshayurved.com , www.smrutiayurved.com ,
    • सध्याच्या काळातील अनेक साथीच्या आजारांपासून आपल्याला वाचविण्यासाठी, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मिळालेले जणू वरदानच.
    • आज BVG लाईफ सायन्सेस मार्फत एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात आदरणीय हणमंतराव गायकवाड सर व  रिसर्च हेड डॉ पवनकुमार सर यांनी एकूणच शतप्लस च्या संसर्गजन्य रोगांच्या सरकारी नायडू रुग्णालयात घेतलेल्या रिसर्च चा डेटा व निष्कर्ष सादर केला.
      यावेळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रायल झाली ते नायडू हॉस्पिटल चे डॉ सुधीर पातसुपे पण  उपस्थित होते.
      या शतप्लस च्या अगदी कोरोना येण्यापूर्वी पासूनच्या नाव देण्यापासूनच्या कार्यात माझाही खारीचा वाटा असल्याने व मी स्वतः 2000 पेक्षा जास्त  लोकांना व कोविड रुग्णांवर हे वापरल्याने मलाही यावेळी माझे विचार, मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. 
      खरंतर आदरणीय हणमंतराव गायकवाड सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदात रिसर्च आयुर्वेदाच्या सिद्धांतांना व आधुनिक निकषांना धरून कसे व्हावेत याबद्दल खूप सुंदर माहिती दिली.
      शिवाय BVG 108 च्या अँम्ब्युलन्स वरील 1000 कर्मचारी या शतप्लस च्या सेवनाने कसे बरे झाले व अनेक जणांचे अनुभव याठिकाणी कथन केले. 
      डॉ पवनकुमार यांनी हर्बल  नॅनो टेकनॉलॉजी व शतप्लस निर्मिती आणि संशोधन याबद्दल मार्गदर्शन केले.
      डॉ सुधीर पातसुते यांनी नायडू हॉस्पिटलमध्ये या ट्रायल CTRI अंडर रजिस्टर होऊन कश्या पूर्ण झाल्या व काय सकारात्मक परिणाम दिसून आले हे सांगितले,
      तर मी या औषधातील घटक व त्यांचा आयुर्वेदाच्या  दृष्टिकोनातून 'शरीर व जंतू' , शेती व बीज, होस्ट अँड घोस्ट थेअरी नुसार आपल्या शरीरावर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कसा फायदा होतो त्याबद्दल मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे जमीन पिकावू असेल तर त्यावर कोणतेही बी पटकन रुजते व उगवते, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात जर जंतुसंसर्ग साठी पोषक वातावरण असेल तर कोविड 19 च काय पण कोणतेही व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला पटकन होते व वाढते.
      हे औषध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवून आजाराला, जंतूंना पोषक वातावरण निर्मितीच होऊ देत नाही.
      त्यामुळे आजार वाढू न देण्याबरोबरच तो बरा करायला पटकन मदत होते.
      थकवा जातो, शक्ती मिळते, इंम्युनिटी कमी झाली असेल तर वाढते, वाढली असेल तर कमी होते, म्हणून हे बेस्ट इंम्युनो मॉड्युलेटर  ड्रग आहे. याचीच सध्या जास्त आवश्यकता आहे.
      काही अन्य औषधे सोबत देऊन आजपर्यंत अनेक कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार याच्या माध्यमातून आजवर आपण यशस्वी केले आहेत. 
      खरंतर आता जनजागृती झाली पाहिजे.
      या महासंसर्गातून वाचायचं असेल तर , आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आपणही शतप्लस चे नियमीत सेवन केले पाहिजे.
      लहान मुलांपासून ते गर्भिणी पर्यंत हे कोणालाही प्रमाण कमी करून देता येते व हे अत्यंत सुरक्षित व दुष्परिणाम रहित आहे. 
      याचा अवश्य आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. अनेक जणांच्या सोयीसाठी हे पुण्यात संहिता स्मृति फार्मा वर , आमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे, अधिक माहिती साठी संपर्क- +918149368523
      आपला
      वैद्य पाटणकर हरिश.
      BAMS, MD, PhD (Sch).
      आयुर्वेदार्य , एम डी, नाडी तज्ञ,
      भारत व रशिया तील प्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक.
  • मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मुखपाक वा तोंड येणे
    • काही दिवसांपूर्वी एक तरुण मुलगा तोंड आलं आहे म्हणून रुग्णालयात दाखवायला आला होता. कित्येक दिवस अ‍ॅलोपॅथीची औषधे घेऊन सुद्धा हा त्रास सतत का होतोय म्हणून यावेळी आयुर्वेदाची औषधे घेऊन बघू असा विचार त्याने केला होता. तोंड आले की आजकाल प्रत्येकाच्या तोंडात प्रथम ‘बी- कॉम्प्लेक्स’च येते. कारण याच्याच कमतरतेमुळे हा ‘ओरल स्टोमाटायटीस’ होतो असे आता पक्के आपल्या मनात िबबवले गेले आहे. मात्र आयुर्वेदात याचे काही वर्णन आहे का व यावर काही उपाय आहेत का हे त्यास जाणून घ्यायचे होते.

      आयुर्वेदात तोंड येण्यालाच ‘मुखपाक’ किंवा ‘सर्वसर’ असे म्हणतात. साधारणत: पित्त वाढले की तोंड येते असे सामान्यपणे समजले जाते. मात्र आचार्य वाग्भटांनी याचे वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सांनिपातिक असे पाच प्रकार सांगितले आहेत. पित्तवर्धक आहार करणे, वेळी अवेळी जेवण करणे, फार काळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवण करणे, दिवसभर अधिक प्रमाणात चहा घेणे, तंबाखू, पानमसाला, गुटखा इत्यादींचे सतत सेवन करणे तसेच रात्रीचे जागरण करणे, अतिउष्ण पदार्थाचे सेवन करणे, आहारात तिखट व मिठाचे प्रमाण अधिक असणे, मांसाहार इत्यादी कारणांमुळे मुखाच्या आतल्या बाजूला किंवा ओठाच्या आतल्या बाजूला कधी कधी जिभेवर लहान लहान ‘गर’ उठतात. तेथील त्वचा सोलवटली जाते. जीभ जड होते. तोंडाच्या हालचाली करण्यास त्रास होतो. अतिथंड किंवा उष्ण पदार्थाचा स्पर्श सहन होत नाही. शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत. अशी एक वा अनेक लक्षणे दिसू लागली की समजावे आपल्याला तोंड आले आहे. काहींना तर यामुळे ओठांवर ‘जर’ उठू लागतात. मात्र हे ‘जर’ वेगळे व तोंडाच्या आतील ‘गर’ वेगळे.  बहुतांशी मुखपाकांचे कारण हे पोटात दडलेले असते. ज्याप्रमाणे आपली जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे असे समजले जाते त्याचप्रमाणे आपल्या जिभेवर, ओठांवर अथवा गालाच्या आतल्या बाजूला आलेले मुखपाक हे बिघडलेल्या पोटाचे द्योतक आहेत.

      किंबहुना बऱ्याचदा पोटातील अल्सर व मुखातील अल्सर हे एकाच प्रकारचे असतात. कारण आपली आभ्यंतर त्वचा मुखापासून गुदापर्यंत एकच आहे. म्हणूनच ज्यांना सततचा  मलावष्टंभाचा त्रास होत असतो त्यांना सारखेच मुखपाक होत असतात.

      तसेच ‘ग्रहणी’ या पोटाच्या आजाराचे लक्षण स्वरूपातसुद्धा मुखपाक येतात. क्वचित ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांना काही काही

      दिवसांनी मुखपाक होत असतात. पण  बरेच दिवस असणारे, स्राव असणारे, ज्यांच्या कडा जाड झाल्या आहेत असे मुखपाक वेळीच तपासून घ्यावेत. कारण बऱ्याचदा यांचे रूपांतर भविष्यात कर्करोगामध्ये होण्याची शक्यता असते किंवा हे इतर एखाद्या पोटाच्या मोठय़ा आजाराचेही द्योतक असू शकतात. अशा प्रकारांत सततचे तंबाखू, गुटखा अशा अमली पदार्थाचे सेवन हा हेतूसुद्धा असू शकतो. मात्र प्रत्येक मुखापाक हा वेगळा समजून त्याचे निदान शोधून वैद्याच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे हाच याच्या त्रासापासून कायम मुक्त होण्याचा मार्ग आहे. कारण ताप अधिक दिवस राहिला, अंगात मुरला तरी तोंड येते. म्हणून प्रत्येक प्रकारानुसार त्याची चिकित्सा बदलते. पण साधारणत: सामान्य कारण जाणवल्यास पूर्वीच्या काळी  घरगुती औषधांमध्ये जाईची पाने चघळण्यासाठी दिली जात असत. त्याने लाळ गाळली की मुखपाक दोन दिवसांत बरा होत असे. मध लावणे, तूप लावणे, तोंडले खाणे असे उपचार काही क्षणिक कारणांनी उत्पन्न मुखपाकात तात्काळ आराम देतात.

      थंड पाण्यात मध मिसळून त्याने गुळण्या केल्यानेही लगेच आराम पडतो. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यासही मुखापक लवकर बरा होतो. काहींना पडलेले व्रण कित्येक दिवस बरेच होत नाहीत. काहींचे काहीही औषध न घेताच दोन-तीन दिवसांत बरे होतात. तर काही मुखपाकांसाठी वैद्याच्या सल्ल्याने औषधे घेणे केव्हाही चांगले.

      बहुतांशी मुखपाकाचे कारण हे बिघडलेले पोट असते, म्हणून प्रथम आपली पचनशक्ती चांगली करण्याकडे लक्ष द्यावे. लक्षात ठेवा अनेक आजारांत लक्षण स्वरूपात मुखपाक होत असतो म्हणून प्रत्येक मुखापाकाचे कारण शोधून चिकित्सा करावी तसेच सर्वच विकारांत प्रथम तोंडचे विकार बरे करावेत. कारण मुखामध्ये आपल्या अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात होत असते. ही सुरुवातच बिघडल्यास अन्नपचन प्रक्रियाच बिघडू लागते व छोटा वाटणारा हा आजार भविष्यात पोटाच्या एखाद्या मोठय़ा आजाराला निमंत्रण देतो.

    • काही लोकांचे एसीतून उन्हात व उन्हातून एसीमध्ये आले की डोके दुखू लागते.

      उन्हाळा वाढू लागला की बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. या डोकेदुखीमागची कारणे आणि प्रकार दोन्ही वेगवेगळे असतात. आधुनिक चिकित्सा पद्धतीप्रमाणे मात्र प्रत्येक डोकेदुखीवर एकच औषध दिलं जातं. ते म्हणजे वेदनाशामक औषध वा पेन किलर. आयुर्वेदात मात्र यातील प्रत्येक लक्षणाचा बारकाईने विचार केला जातो व त्यानुसार त्याची चिकित्साही बदलते.

      काही लोकांचे एसीतून उन्हात व उन्हातून एसीमध्ये आले की डोके दुखू लागते. हा प्रकार दोन विरोधी गुणांच्या गोष्टी एकत्र केल्याने होतो. आपले शरीर हा बदल स्वीकारायला लगेच तयार झालेले नसते त्यामुळे शिर:प्रदेशातील तापमान नियंत्रक केंद्रावर ताण येऊन डोके दुखू लागते. आपल्याकडे साधारण सध्या उन्हाळ्यामध्ये एसी १७ ते २० अंश सेल्सिअस या तापमानाला सेट केला जातो, तर त्याच वेळी बाहेरील तापमान ४० पर्यंत गेलेले असते. अचानक आत-बाहेर केल्याने शरीराला एकदम २० अंश सेल्सिअसच्या बदलाला सामोरे जावे लागते. रशियामध्ये तर कधी कधी बाहेरील तापमान उणे २० व आतील रूम तापमान २० अंश असल्याने ४० अंशांचा फरक पडतो व तेथील बहुतांशी लोकांना मायग्रेन अथवा सततची बारीक डोकेदुखी मागे लागलेले अनेक रुग्ण मी पाहिले आहेत. काही रुग्ण बाहेरून भर उन्हातून फिरून आले की लगेच जोरात लावलेल्या पंख्याच्या वाऱ्याखाली बसतात अथवा फ्रिजमधील थंडगार पाणी भरपूर प्रमाणात पितात. ही सवय असणाऱ्यांचेही कालांतराने डोके दुखू लागते. फ्रिजमधील थंड पाणी अथवा आइस्क्रीम शरीरात आल्यानंतर त्याचे पचन व्हावे लागते. हे पचन करण्यासाठी शरीराला अगोदर या दोन्हीला उणे तापमानातून शरीरातील सामान्य तापमानाला आणावे लागते. यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. पर्यायाने जास्त पित्तस्राव झाल्याने पित्त वाढून डोके दुखू लागते. काही लोकांचे सूर्य जसजसा वर चढू लागतो तसतसे डोके दुखणे वाढू लागते. या प्रकाराला ‘सूर्यावर्त’ असे म्हणतात. सायंकाळ झाली कीडोके दुखणे थांबते. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसेच. या प्रकारात माका म्हणजे भृंगराज डोक्यावर स्वरस काढून लावावा व वैद्यांच्या सल्ल्याने २-२ चमचे रस पोटातूनही घ्यावा म्हणजे यातून कायमची मुक्ती मिळते. तर यातच काहींना अर्धशिशी म्हणजे अर्धे डोकेदुखीचा त्रास होतो. तर काहींना फक्त माथा शूल होतो. आमचे आजोबा अर्धशिशी झालेल्यांना अर्धी सुपारी उगाळून कपाळावर लेप लावायला सांगत याने अर्ध डोकेदुखी लगेच थांबते. तर काहींना ते ज्या बाजूचे डोके दुखत आहे त्या बाजूच्या नाकपुडीत अग्निकर्म करून रक्तस्राव होऊ देत, यामुळेसुद्धा अर्धशिशी पटकन बरी होत असे. फक्त माथा शूल असेल, घणाने घाव घातल्याप्रमाणे डोके दुखत असेल तर दूर्वाची पेंडी तयार करून डोक्याला बांधावी किंवा दूर्वा स्वरस २-२ थेंब दोन्ही नाकपुडय़ांमध्ये टाकावा. ज्यांचे सतत बारीक डोके दुखत असते त्यांनी सुंठीचा लेप कपाळावर लावावा.

      काहींना पित्त वाढल्याने डोके दुखते, यांना उलटी केल्याशिवाय, पित्त बाहेर पडल्याशिवाय बरे वाटत नाही. यांनी किमान एकदा तरी आयुर्वेद शास्त्रोक्त वमन हा पंचकर्म उपचार करून घ्यावा. यामुळे पित्तज डोकेदुखीच्या कायमच्या त्रासापासून मुक्ती मिळते. तर काहींचे कफ वाढल्याने, सततच्या सर्दीमुळे डोके दुखत असते. अशांनी ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे. काहींना वाहनावरून जास्त प्रवास केल्याने, कामाचा अतिरिक्त ताण पडल्याने, थंड वारे लागल्याने डोके दुखू लागते. हा वातज प्रकार आहे. यात कापूर घातलेल्या खोबरेल तेलाने डोक्याचा मसाज केल्यास बरे वाटते. ज्यांना रात्री जागरण झाल्याने डोके दुखत आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणापूर्वी झोप घ्यावी व आहारात तूप व गुलकंद घ्यावा. बऱ्याच जणांना पोट साफ होत नसल्यामुळे डोके दुखू लागते. त्यांना पोट साफ होण्याचे औषध दिले की लगेच बरे वाटते. लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकाचे डोके दुखण्याचे कारण वेगवेगळे असते, त्यामुळे आयुर्वेदात प्रत्येक डोकेदुखीची वेगवेगळी चिकित्सा सांगितली आहे.

    • मागच्या आठवडय़ात मी एका उपाहारगृहात दुपारी थोडा वेळ बसलो होतो.

      मागच्या आठवडय़ात मी एका उपाहारगृहात दुपारी थोडा वेळ बसलो होतो. तेवढय़ात त्या ठिकाणी कॉलेजमधील चार पाच तरुण-तरुणी आले. एकामागून एक ते कोण काय पिणार? याबद्दल चर्चा करत थंड पेय मागवत होते. गंमत म्हणजे ते काय मागवत आहेत यापेक्षा ते घेण्यामागचं त्याचं कारण भन्नाट होतं. एक म्हणाला, मला पेप्सी प्यायची आहे, तर दुसरा कोकाकोला मागवत होता, कारण काय तर हे पेय प्यायल्यानंतर जे ढेकर येतात ते यास फार आवडतात म्हणून. उन्हाळा आहे. शरीरात थंडावा निर्माण करणारे काहीतरी प्यावे असा एकाचाही विचार या वेळी नव्हता. यात खरे म्हणजे ‘उद्गार’ अर्थात ‘ढेकर’ येणे हे प्राकृत आहे का विकृत हेच बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. आयुर्वेदात अन्नाचे पचन पूर्ण झाल्यानंतर ‘उद्गार शुद्धी’ हे लक्षण सांगितले आहे. यास आपण ‘प्राकृत ढेकर’ असे म्हणू शकतो. काहीजण ढेकर आला की आता ‘बास’. फार जेवण झाले असे म्हणतात. या ठिकाणी आहार जास्त घेतल्याने आपल्या जठरामध्ये वायूला जागा कमी पडते व तो वर सरकतो आणि ढेकर येतो, ही उद्गार शुद्धी नाही. हा फक्त ‘उद्गार’ मात्र हा व्याधी पण नाही. हे एक लक्षण आहे आता पोट पूर्ण भरलेले आहे याची जाणीव करून देणारे. अगदी पोटाला तडस लागेल इतका आहार करू नये. आपण एक कोर कमी खाऊन वायूला फिरता येईल एवढी जागा जठरात ठेवावी म्हणून हा ढेकर आला आहे. तर काहींना जेवण झाल्यानंतर काही वेळाने खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येतात. हे विकृत आहेत. हे अन्न पचन प्रक्रिया नीट होत नाही याचे द्योतक आहेत. हा कफज प्रकार असून बहुदा पाचक अग्नी मंद झाल्याने असे ढेकर येतात. काहींना तर करपट, आंबट, तिखट अशा स्वरूपाचे ढेकर येतात हेही सर्व ढेकराचे विकृत प्रकार समजावेत. यात पित्ताची विकृती अधिक असते. काहींना ढेकर नीट सुटत नाही. त्यामुळे नीट ढेकर नाही आला तर त्यांना छातीत जखडल्यासारखे होते, हृदयावर ताण येतो. काहींना क्वचित अजीर्ण झाल्यामुळे असा ढेकर आल्यास व तो अडकून बसल्यास हृदयावर ताण येऊन क्वचित प्रसंगी हार्ट अ‍ॅटक येऊन मृत्यू पण येतो. काही लोकांचे ढेकर सुटतानाचे आवाज ऐकून शेजारीपाजारी पण घाबरून जातात. हा ‘सशब्द’ ढेकर असतो, यात वाताची विकृती अधिक असते. काहींना पोट साफ झाले नाही की ढेकर सुरू होतात. काहींना सतत दिवसभर कोणत्याही कारणाशिवाय ढेकर येत असतात, काही ढेकर हे दुसऱ्या एखाद्या आजाराचे म्हणजे ग्रहणी वगैरेचे लक्षण म्हणून येतात. माझ्याकडे एक रुग्ण आले होते त्यांना गर्दीत गेले, कोणी हातात हात मिळवला अथवा साधे कोणी गमतीने जरी त्यांचे दंड दाबले तरी त्यांना ढेकर येत असे. या प्रकारात ‘मांसगतवात’ असे निदान करून औषधोपचार केल्याने त्यांना बरे वाटले. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ढेकर ही काही गमतीने काढण्याची किंवा गमतीने येणारी गोष्ट नाही. त्यामागे मोठी कारणमीमांसा दडलेली असते. अनेक व्याधी असू शकतात. प्रसंगी ढेकर नीट न आल्याने मृत्यूसुद्धा येऊ शकतो. म्हणून उगीच गमतीने ढेकर काढत बसणे हेदेखील चुकीचे आहे. किंवा छान ढेकर येतात म्हणून कार्बन डाय वायू मिसळलेली पेय पिणेसुद्धा घातक आहे. तर बऱ्याचदा अ‍ॅसिडिटी वाढली की लोक लिंबू पाणी, सोडा, इनो अथवा जेलुसीलसारखी पित्तशामक औषधे घेतात. ही घेऊन ढेकर आला की त्यांना बरे वाटते व पित्तही कमी होते. जाहिरातीत पण तसेच दाखवतात. तरीही घरगुती उपायांमध्ये वरील ढेकरांच्या प्रकारांचे तारतम्य बाळगून कफज प्रकारात फक्त घोट घोट कोमट पाणी पीत राहावे, याने खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन पटकन बरे वाटते. ओवा, खाण्याचा सोडा घेतल्यानेही तत्काळ बरे वाटते. पित्तज प्रकारात थंड दूध, गुलकंद, प्रवाळ अथवा शंख भस्म मधातून घ्यावे. तर वाताज प्रकारात खाण्याचा सोडा, लिंबू पाणी, तूप अथवा पोट साफ करणारी औषधे घेतली की बरे वाटते.
      लक्षात ठेवा या सर्व विकृत प्रकारात प्रथमत: आपली पचनशक्ती नीट करणे गरजेचे आहे. वैद्यांचा सल्ला घेऊनच योग्य ते औषधोपचार करावेत म्हणजे ढेकर कधीही ठोकर मारणार नाही.

    • पूर्वीच्या काळी भारतीय लोक चुलीतून तयार होणाऱ्या राखेने दात घासत असत

      पूर्वीच्या काळी भारतीय लोक चुलीतून तयार होणाऱ्या राखेने दात घासत असत. नंतर काही कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला आणि राखेने, कोळशाने दात घासणे दातांच्या आरोग्याला किती घातक आहे असे ते पटवून देऊ लागले. त्यांनी कॅल्शियम असणाऱ्या पावडर व पेस्ट विकायला आणल्या. सर्वानी त्याचा वापर सुरू केला. हळूहळू लोकांचे दातांचे आरोग्य सुधारण्याऐवजी खराबच होत गेले. मग सतत काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नात त्यांनी ‘टूथपेस्ट में नमक है? निंबू है?’ अशी विचारणा करत हळूहळू पेस्टमध्ये मीठ, लिंबू, निंबपत्र अशा वेगवेगळ्या आयुर्वेदिकव पारंपरिक गोष्टींचाच समावेश करून आपले मार्केट कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही लोकांचे दातांचे आरोग्य काही सुधारत नाही असे लक्षात आले.
      एकाच घरामध्ये पारंपरिक पद्धतीने दात घासणाऱ्या आजोबांचे दात चांगले आहेत, तर गेली सलग २० वर्षे पेस्ट वापरणाऱ्या आधुनिक विचारांच्या मुलांचे दात खराब होऊ लागले आहेत. नातवांच्या दातांच्या आरोग्याबद्दल तर न बोलणेच चांगले, अशी परिस्थिती सध्या आली आहे. प्रत्येकाने रोज दोन दोन वेळा पेस्टने ब्रश करूनही लोकांमध्ये दातांचे आरोग्य खालावलेले आहे. असे का होत आहे याचा अभ्यास करून मग कंपनीने पुन्हा आपल्या पेस्टमध्ये थोडा बदल करत त्यात ‘चारकोल’ वापरून नवीन पेस्ट बाजारात आणली. हा चारकोल तुमच्या दातांमध्ये खोलवर लपून बसलेले किटाणू घालविण्यास सक्षम असून याने दातांचे आरोग्य वाढते असा दावा सुरू केला. मोफत मिळणारा कोळसा किंवा मीठ हजार रुपये किलो दराने आम्हालाच विकायला सुरुवात केली. जरा विचारपूर्वक या संपूर्ण घटनेकडे पाहा. हा चारकोल म्हणजेच कोळसा म्हणजेच राख. पण आतासुद्धा कोळशाने किंवा राखेने दात घासा म्हटलं तर कोणी घासणार नाही, मात्र चारकोलयुक्त पेस्टने घासा म्हटले की लगेच विश्वास ठेवून घासतील.

      पूर्वीच्या काळी दातांचे, हिरडय़ांचे आरोग्य सुधारावे म्हणून दंतधावन केले जात होते. आजकाल फक्त मुलींनी आकर्षित व्हावे, मुखदरुगधी जावी व दात पांढरेशुभ्र स्वच्छ दिसावेत फक्त एवढय़ासाठीच दात घासले जातात. मग फेस येण्यासाठी व दात स्वच्छ होण्यासाठी त्यात सोडियम लॉरेल सल्फेट नावाचे रसायन मिसळले जाते.

      आजकाल फेस आला नाही तर दात घासलेत असे लोकांना वाटतच नाही. मग याचे प्रमाण अधिक झाले की दातांची झीज सुरू होते. दात स्वच्छ दिसतात मात्र लवकर झिजतात. जसे कपडे जास्त स्वच्छ दिसण्यासाठी जास्त घासले, जास्त साबण लावून जास्त फेस केला की ते स्वच्छ होतात, दिसतात मात्र लवकर झिजतात तसेच. मग दाताच्या वरचा थर झिजून तुमचे दात संवेदनशील बनतात. मग या सेन्सिटिव्ह दातांसाठी नवीन पेस्ट. जास्त झिजले तर सिमेंट भरणे, रूट कॅनॉल करणे आलेच. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल, आपल्या नव्या पिढीचे दात वाचवायचे असतील तर प्रत्येक आहारानंतर मुलांना प्रथम खळखळून, आवाज करून चूळ भरण्याची सवय लावा. जास्त वेळ पेस्टचा अतिरेक टाळा व किमान पेस्ट करून झाल्यानंतर मुलांना लिंबाच्या काडीने दात घासणे, हळद व मीठ सम प्रमाणात घेऊन त्याने दात घासणे किंवा अर्क, खदिर, करंज अशा वनस्पतींनी युक्त आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासायची सवय लावली पाहिजे.

      ज्यांचे दात फार पिवळे होत आहेत त्यांनी मधाने दात घासले तरी स्वच्छ पांढरे होतात हा अनुभव आहे. हे सर्व घटक दातांमधील किटाणू मारून टाकतात व हिरडय़ांना बळ देतात. कोणतीही राख, कोळसा हा सर्वोत्तम स्वच्छताकारक असतो. म्हणून पाणी स्वच्छ करण्यासाठीसुद्धा अनेक जलशुद्धीकरण केंद्रात याचाच वापर करतात. लक्षात ठेवा सर्वच जुन्या गोष्टी टाकाऊ नसतात आणि सर्वच नवीन जाहिराती आरोग्यदायक नसतात. आपल्या काही जुन्या परंपरांच्या पाठीमागील शास्त्र शिकून घेतल्यास आपल्या दातांना नक्कीच चांगले आरोग्य प्राप्त होईल.

    • आज भारताची वाटचाल मधुमेहाची राजधानी होण्याकडे चालू आहे.

      आज भारताची वाटचाल मधुमेहाची राजधानी होण्याकडे चालू आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेले याचे प्रमाणसुद्धा विचार करायला लावणारे आहे. तर लहान मुलांमध्येसुद्धा आता मधुमेहाचा एक प्रकार आढळू लागला आहे. हा पूर्वी होता का? आताच याचे प्रमाण का वाढले? आणि महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदात यावर काही औषध आहे का? हे लोकांचे नेहमीचे प्रश्न. यातीलच बहुतांशी लोक रक्तातील साखर कमी करण्यासाठी लोकांनीच सांगितलेले वेगवेगळे घरगुती उपचार घेत राहतात आणि आयुर्वेदिक औषधे घेऊनही मधुमेहावर ताबा मिळत नाहीये असे म्हणतात. कारल्याचा रस, जांभळाचा रस, मेथीची पावडर, दुधी भोपळ्याचा अथवा कडुनिंबाच्या पाल्याचा रस हे त्यातील काही नेहमीचे ज्यूस. सकाळी फिरायला गेले की एक रस पिऊनच येतात. मला सांगा खरंच हा फक्त घरगुती उपचाराने बरा होणारा आजार आहे का?
      एकच औषध आधुनिक शास्त्रातसुद्धा नाही जे सर्वाची रक्तशर्करा नियंत्रित ठेवेल. त्यांनासुद्धा आता प्रत्येक व्यक्तीचा मधुमेह वेगवेगळा तपासून वेगवेगळी औषधे व त्यांचा डोस नियंत्रित करावा लागतो. आणि आता पुन्हा एकदा एक नवीन संशोधन चालू आहे की जे या आजाराचा आणि रक्तातील साखरेचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट करत आहे. म्हणजे आपण परत पूर्वीच्या आयुर्वेदातील निदान पद्धतीकडे जाणार आणि परदेशात यावर संशोधन होऊन ते परत आपल्याला त्याचे महत्त्व पटवून देणार. मात्र कदाचित त्या निदान पद्धतीचे नाव वेगळे असेल व त्यासाठी आपणास जास्त पैसेपण मोजावे लागू शकतात. मग नक्की काय आहे ही निदानाची पद्धत? तर मधु म्हणजे मधाप्रमाणे आणि मेह म्हणजे मूत्रप्रवृत्ती. ज्यांना मधाप्रमाणे मूत्रप्रवृत्ती आहे फक्त त्यांनाच मधुमेही असे म्हणता येते. मात्र आजकाल सर्वानाच रक्तात साखर आली की मधुमेही म्हणतात हे चुकीचे आहे. त्यातही आधुनिक शास्त्रात त्याचे फक्त प्रमुख दोनच प्रकार पडतात. आयुर्वेदात मात्र प्रमेहाचे वीस प्रकार सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीने रुग्ण परीक्षण व मूत्र परीक्षण करून हे ठरवतात. उसाच्या रसाप्रमाणे लघवी होत असल्यास इक्षुमेह. इक्षु म्हणजे ऊस. असेच उदकमेह, कालमेह, नीलमेह, रक्तमेह, सारमेह, सांद्रमेह, मंजिष्ठामेह, हरिद्रामेह असे ज्या प्रमाणे मूत्रप्रवृत्ती तो मेह असे करत कफज दहा, पित्तज सहा व वाताचे चार असे एकूण वीस प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम प्रत्येकाचेच लगेच मधुमेह हे निदान करणे चुकीचे आहे. दुसरे असे की यातील सर्व मेह लवकर चिकित्सा सुरू केली तर हमखास बरे होतात. त्यामुळे सर्वात शेवटी आयुर्वेदाकडे येण्याऐवजी प्रथम यावे.
      कफज प्रकारातील दहा तर साध्यच आहेत. पित्तज याप्य तर वातज असाध्य आहे. आता मला सांगा एखाद्याला वातज प्रकारातील मेह आहे आणि त्याने जांभळाचा ज्यूस घेतला तर जांभूळ कषाय रसाचे असल्याने त्याचा मेह अजूनच वाढेल. कफज प्रकारात कडुनिंब, कारल्याचा रस यांचा चांगला उपयोग होईल, मात्र तेच पित्तज मेहास वाढवतील. म्हणून कोणतंही घरगुती औषध सेवन सुरू करण्यापूर्वी आपला प्रकार कोणता आहे याचे तज्ज्ञ वैद्यांकडून निदान करून घ्यावे. लक्षात ठेवा, प्रमेह हा प्रथम पचनसंस्थेचा आजार आहे. घेतलेले अन्न नीट पचन होत नाहीये म्हणून रक्तात साखर येत आहे किंवा लघवीचे प्रमाण वाढणे, तहान लागणे, भूक वाढूनही वजन कमी होणे ही लक्षणे दिसत आहेत. म्हणून प्रथम पचनसंस्था सुधारा. भूक लागली असेल तरच खा. अन्न चावून चावून खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते व रक्तातील साखरही पटकन कमी होते हे आता सिद्ध झाले आहे. व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, चिंता, ताणतणाव, वेळी-अवेळी जेवण, रात्री-अपरात्री जेवणानंतर घेतलेल्या स्वीट डिशेस, दुपारी जेवणानंतर झोपणे हे सर्वप्रथम आपली पचनशक्ती बिघडवतात व नंतर न पचलेली अनावश्यक साखर रक्तात पडून राहते व आपले निदान मधुमेह होते आणि आयुष्यभराची औषधे मागे लागतात, कारण आग रामेश्वरी तर बंब सोमेश्वरी अशी चिकित्सा सुरू होते.

    • आजकाल अजिबात व्यसन नसणाऱ्यांनासुद्धा कर्करोग झालेला पहावयाला मिळतो.

      सध्या भारतीयांमध्येसुद्धा कर्करोगच्या प्रमाणात लाक्षणिक वाढ झालेली दिसून येऊ लागली आहे. पूर्वी फक्त कोणतं न कोणतं व्यसन असणाऱ्यांना हा आजार होण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र आजकाल अजिबात व्यसन नसणाऱ्यांनासुद्धा कर्करोग झालेला पहावयाला मिळतो. सध्या कोणालाही कर्करोग होऊ शकतो. मध्यंतरीच्या काळात ‘हरित क्रांती’ व ‘धवल क्रांती’ झाली आणि भारतीय शेती व पशुपालन व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. या क्रांतीमुळे पिकांची, दुधाची वाढ झाली. हायब्रीड बी-बियांमुळे धान्यांचे उत्पादन वाढले. पाश्चिमात्य देशांनी आपल्या पारंपरिक शेतीत या हरित क्रांतीच्या नावाखाली युरिया, पोटॅशियम इत्यादी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करावयास सुरुवात केली. आता हीच रसायने कर्करोगाचे जनक आहेत, हे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. खरं तर कोणतीही अनियमित वाढ म्हणजे कर्करोगच. जी या पिकांच्या व धान्यांच्या बाबतीत झाली तीच परिस्थिती ते अन्न खाणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या बाबतीत होऊ लागली व पेशींच्या वाढीचे नियंत्रण सुटून ठरावीक पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागली. त्यामुळे कोणतेही व्यसन नसणारे, दारू, तंबाखू, सिगारेट न ओढणारे, फक्त फळभाज्या, पालेभाज्या असा शुद्ध सात्त्विक शाकाहार करणारेसुद्धा या कर्करोगाच्या विळख्यात येऊ लागले. त्यात भरीस भर पडली ती सध्याच्या फास्ट फूडमधील काही पदार्थाची, त्यात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चायनीज सॉसची, तर प्लास्टिकसारख्या पात्रांचा आहारातील वाढलेल्या वापराची. साधं एखाद्या प्लास्टिकच्या चहाच्या प्यालातून चहा पिऊन पहा. प्याल्याच्या आतल्या बाजूला एक पातळ मेणाचा थर असतो जो चहा ओतताच चहावर येतो. हलक्या दर्जाच्या प्लास्टिकच्या बाटलीत जास्त वेळ पाणी राहिले तरी त्याची चव बदलते. म्हणजेच त्यातील शरीराला घातक असे घटक पाण्यात मिसळतात. एवढेच काय पण नुकतंच एका प्रसिद्ध कंपनीच्या बेबी पावडरमध्येही कर्करोग निर्माण करू शकणारे घटक आढळल्याने, त्यांना ही कित्येक कोटींच्या दंडाला सामोरे जावे लागले.
      एवढे सर्व असूनही पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतीयांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण त्या मानाने अजून कमीच का आहे? हे शोधण्यासाठी पाश्चिमात्य लोकांनी एक सव्‍‌र्हे केला असं ऐकण्यात आलं होतं आणि या सव्‍‌र्हेमध्ये असे निदर्शनास आले की, भारतीयांच्या रोजच्या आहारामध्ये असा कोणता तरी पदार्थ असला पाहिजे ज्याचा ते रोज सेवन करत आहेत आणि तो कर्करोग विरोधी आहे. मात्र गम्मत म्हणजे परंपरेने वापरत असल्या कारणाने भारतीयांना तो माहीतही नाही. या पदार्थामुळेच भारतीयांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी आहे, हे सिद्ध झालं होतं. मग अथक प्रयत्नांनंतर एकदाचा तो पदार्थ त्यांनी शोधून काढला आणि तो पदार्थ म्हणजे भारतीयांच्या स्वयंपाकघराची आणि गृहिणींची जीव की प्राण अशी ‘हळद’! या हळदीमध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारी, रोखणारी तत्त्वे असल्यानेच हिच्या नियमित सेवनाने कर्करोगावर मात करता येऊ शकते, असं लक्षात आलं. मग ही सर्व पाश्चिमात्य मंडळी त्या हळदीपासून कर्करोगावरील औषधे तयार करू लागली व हळदीचे पेटंट घेण्याच्याही मागे लागली. मात्र त्यांचा हा ‘पेटंट’चा डाव काही साध्य झाला नाही.
      पूर्वीपासून अगदी पाय मुरगळला, जखम झाली, ताप कणकण आली की सर्वाच्या घरात लगेच प्रथम हळद वापरली जायची. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत खोकला आला की, हळद दूध ठरलेलंच. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचं एक विलक्षण सामथ्र्य या हळदीत आहे. आपल्याच परंपरेत, मसाल्यामध्येच एवढा मोठा आरोग्याचा साठा दडलाय, की जो आपणास कित्येक वर्षे कर्करोगासारख्या दुर्धर आजारापासून वाचवत आहे हे आपल्यालाच माहीत नाही हे आपले दुर्दैव. याबाबत आपल्या आयुर्वेदाचे ऋषी-मुनींचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, कारण त्यांच्यामुळेच कळत नकळत आपल्या आरोग्याचे अजूनही रक्षण होत आहे. मात्र आता आपणच यापासून दूर चाललो आहोत आणि नको नको ते आजार ओढवून घेत आहोत.

0 Comments

Your Review

Required fields are marked *

Our Treatments & Speciality

  • Skin Care
  • Ayurvedic Doctor Consultation
  • Infertility
  • Hair Fall Treatment
  • Kidney Stones
  • Jaundice
  • Fever Treatment
  • Migraine
  • Dengue Fever Treatment
  • Headache
  • Liver Problems
  • Alopecia
  • Women Healthcare Problems
  • Obesity
  • Thyroid
  • Diabetes
  • Hypertension (Blood Pressure)
  • Kati Basti
  • Janu Basti
  • Arthritis
  • Panchakarma
  • GarbhSanskar
  • Agnikarma
  • Nadee Pariksha

Awards

  • Awarded with “ Swadeshi Bharat Sanman -2009”
  • Awarded with “ Pujya Padacharya Rachanatmak Karya – 2016” 
  • Awarded with “Ayurved Mitra Puraskar- 2018.
  • Awarded with Best President of Lions Club Of Pune Supreme 2014.
  • Awarded Three Times with Special Trophy for “Sanwad Parivartanacha” by Commissioner Of Pune For outstanding work in criminal counseling. 2015.
  • Awarded By Commissioner Of Police Mrs Meera Borwankar for special social work for police.
  • Appreciated By Traffic Commissioner Of Police Mr Vishwas Pandhare for Netratarpan Project.
  • Appreciated By Ayush Minister Govt. Of India Hon. Mr. Shripadji Naik and Ex. President Of India Hon. Mrs Pratibhatai Patil for project of Smruti Ayurveda. 
  • Got First Prize in Poster Presentation At First International Ayush Conference held at Dubai with Ministry Of Ayush (Govt Of India). 
  • Special Appriciation for Paper Presentation On Nadee Parikashan via Modern Technique at 7th World Ayurved Congress held at Kolkatta in 2016. 
  • Conducted 1st International Symposium at Pune in Jan 2018. Special appreciation and presence of Ayurved Chairperson Ambassy Of India, Hungary, Dr Asmita Wele. 
  • Completed Successfully Netratarpan of more than 6500 delegates and patients via Camps with Lions Club International.
  • Motivated more than Thousands of Students and Doctors to start Ayurvedic practice in India and Abroad. 
  • Website Links For More Info- www.keshayurved.com , www.smrutiayurved.com ,

Blogs